Door Step School extensively works with the parents to encourage their active participation in their child’s education. This is imperative for the child’s regularity and for reducing the number of drop outs.
Few of our initiatives through our program ‘Parents’ Participation in Child’s Education (PPCE)’, we have formed groups of parents we call ‘Palak Gat (पालक गट)’ and a group of mothers which we call ‘Maitrin Gat (मैत्रीण गट)’. In the meetings we conduct for these groups, we tell the parents about various ways to encourage learning in children, like ensuring that they do their homework, or just sit with them and ask them to read aloud, tell their children stories and also check their learning levels. The parents have started doing this. The objective behind helping them assess their children’s learning levels is that they can discuss their progress with their school teachers. When we discussed their children’s learning levels at one of our meetings, we noticed that the learning levels of those children whose parents are aware of the levels are as expected. We could thus point out to all the parents at the meeting that, the more aware and actively participating the parents are in their children’s education, the better the child does at school.
Also, in this effort for the parents to help improve their children’s learning levels, the PPCE team arranged a book exhibition of DSS books where parents could purchase the books based on the learning levels of children. Almost all parents, whether they were members of the Palak Gat or not, visited the exhibition. Few parents who couldn't, asked the children to purchase the books. Few parents who cannot read, asked our team to help them out with appropriate books, while few who did not have enough money bought the books promising to pay us later. A Grandmother of one of the children could read, she herself read through our ‘Jodakshar Sarav’ books and bought a set of 2 for her grandchild. The children were seen reading our books, they were enjoying them. We suggested to the parents that they could buy different sets of books and then exchange them with other members of the community. We sent messages for the rest of the parents who couldn’t be present that they could ask us for books whenever they wished and we could get them for them.
The fact that the parents not only came to the exhibition but also showed willingness to buy books for their children is definitely a positive step in our efforts towards encouraging them to actively participate in their education!
Below is the original report in words of Mr. Harishchandra Phadke, our on-field staff member:
'आपण बाणेर बालेवाडी विभागात पालक सहभाग प्रकल्पाचे काम करत आहोत. पालकांची जाणिव जागृती वाढ्विण्यासाठी पालक गट व कायम वस्तीमध्ये मुलांच्या आई यांचा गट म्हणजेच मैत्रीण गट केलेले आहेत. याचा उद्देश आहे की,मुल शाळेत नियमित जावी व त्यांची वाचन क्षमता योग्य असावी यासाठी या पालकांबरोबर काम करत आहोत दर महिन्याला एक दिवस एक तास याची मिटिंग त्याच्या वेळेनुसात नियोजित केली जाते व या मिटिंग मधून मुलांच्या वाचन क्षमता काय आहेत आणि कुठे असायला पाहिजे याची जाणिव करून दिली होती. तर या पालकांना आपण शाळेत जावून शिक्षकांना भेटायला व त्यांच्या मुलांच्या क्षमता काय आहेत व त्या योग्य होण्यासाठी काय करावे विचारण्यासठी तयार करत आहोत.
मुलांच्या क्षमता काय आहेत याची मिटिंग घेतली त्यावेळी पालकांना विचारले तुमची मुले कोणत्या क्षमतेत आहेत ते विचारले व त्यांची क्षमता काय आहे व त्यांची क्षमता काय असायला हवी याची चर्चा केली.
या चर्चेतून सांगण्यात आले की जे पालक लक्ष देत आहेत त्यांच्या मुलांची क्षमता ठिक आहे. व आपली मुले जर योग्य क्षमतेत आणायची असेल तर आपल्याला म्हणजेच पालकांना अधिक लक्ष द्यावे लागेल. तर या मुलांचा अभ्यास घेण्यासाठी द्स्स ची पुस्तके उपयोगी पड्तील म्हणून वस्तीमध्ये पालकानी पुस्तके खरेदी करावी त्यासाठी पुस्तक प्रदर्शन लावले होते.
ज्यावेळी आपण पुस्तक प्रदर्शन वस्तीमध्ये लावले त्यावेळी पालकानी मुलांसाठी पुस्तके खरेदी केली. काही पालक अशिक्षित होते त्यांनी आमच्या मुलांना कोणते पुस्तक घ्यावे असे विचारून पुस्तके घेतली. काही पालकांनी मुलांकडी पैसे दिले होते, काही पालकांनी पैसे उद्या देतो म्हणून पुस्तके घेतली आपणही मुलांना पुस्तके घ्यावीत त्यासाठी आपण उधार दिली आहेत. काही पालक गटामध्ये नव्हते परंतू त्यांनीही आपल्या मुलांना गोष्टीची पुस्तके घेतली. एका आजीबाईनी आपल्या दोन नातवासाठी जोडाक्षर सरावाची २ पुस्तके घेतली. त्या शिक्षित होत्या त्यांनी स्वतः वाचून पाहीली व घेतली एका पुस्तकाचे पैसे दिले व उद्या एका पुस्त्काचे पैसे उद्या देणार होत्या.
मुल पुस्तके वाचत होती. त्यांना मजा येत होती. काही मुलांचे पालक नसल्यामुळे त्यांना पुस्तके घेता आली नाहीत. आम्ही पालकांना सांगत होतो की नंतर केव्हाही पुस्तके घ्यायची असल्यास आम्हाला सांगा आम्ही आणून देतो.
एकंदरीत पालक पुस्तके घेण्यास तयार होते. आणि आपणही त्याची महत्व सांगितल्यामुळे त्यांना पुस्तके घेण्याचे महत्व वाटत होते.
ज्या मुलांची जोडाक्षर पुर्ण होती त्यांच्या पालकांनी मुलांना जोडाक्षर सहीत गोष्टीची पुस्तके घेतली आहेत. मुलांना आम्ही वेगवेगळी गोष्टीची पुस्तके दिली व सांगित की, एकमेकांना पुस्तके द्या म्हणजे अनेक गोष्टी तुम्हाला वाचायला मिळतील.
जर आपण पालकांना पुस्तके घेण्याचे महत्व सांगून तशी संधी दिली तर मुलांसाठी पुस्तके घेवू शकतात.’
No comments:
Post a Comment