Friday, March 13, 2020

Lets meet one of our Young scientist



विशेष नोंद शुभम शिवजन्म दास


      २०१८-१९ वर्षा पासून वस्ती वाचनालया मार्फत सायन्स प्रदर्शन भरवले जाते. जे  विषय मुलांना शिकवले जातात. त्या प्रयोगाचे तत्व आणि दैनंदिन जीवनात त्या प्रयोगाचा वापर  कसा होतो, किंवा कसा करून घेतात याबद्दल सांगितले जाते. तसेच या प्रयोगाला अनुसरून काय काय शिकतो, याबद्दल ही चर्चा केली जाते. यासाठी मागील दोन वर्षांपासून दोन स्वयंसेवक येतात.  त्यांची नावे  शर्मिष्ठा देशपांडे जेसीका ताई आहेत. त्या मुलांसोबत आणि शिक्षिकेसोबत काम करीत आहेत.
      शुभम शिवजन्म दास हा इयत्ता १०वी चा विद्यार्थी आहे. हा विद्यार्थी हडपसर सेंटर सुरू झाल्यापासून येत आहे. सी एल सी कडून विज्ञान प्रयोग भरवले जातात त्यामध्ये शुभम भाग घेत असतो. यावर्षी मुलांना मेजरमेन्ट हा प्रयोग घेतला होता. दिनांक २५ जानेवारी २०२० सी एल सी कडून विज्ञान प्रयोग प्रदर्शन भरवले होते. त्यामध्ये शुभमने भाग घेतला होता. त्याने मेजरमेन्टला अनुसरून व्हीलचा वापर करून,आपण कश्या पध्दतीने मीटर मध्ये मोजणी करु शकतो. एका सायकलच्या चाक घेऊन त्याला एक इंडिगेटर लाईट लावून चाक फिरल्यावर कसे दोन मीटर मोजणी होते,हे त्याने त्यांच्या प्रयोगा मार्फत दाखवले होते.
       हे प्रयोग पाहण्यासाठी आगस्त्या फौंडेशनचे श्री पांडुरंग जाधव सर आले होते. त्यांनी सांगितले की, आगस्त्या फौंडेशनकडून सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रयोगात वेगळे पण वाटते. अश्या मुलांनी त्यांच्या प्रयोगाचे व्हिडिओ करून पाठवायचे होते. त्यासाठी सी एल सी प्रदर्शनातील २९ प्रयोगा पैकी १७ प्रयोग निवडले होते. त्यापैकी शुभम दासचा मेजरमेन्ट हा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रातून १७/२/२०२० रोजी महाराष्ट्रातून २० मध्ये त्याचा प्रयोग निवडला गेला. त्याला या प्रयोगाच्या वेळी  शर्मिष्ठा देशपांडे, जेसीका ताई, मनीषा धनवडे हडपसर सुपरवायझर यांचे मार्गदर्शन लाभले.
       दिनांक १२/३/२०२० रोजी आगस्त्या फौंडेशनकडून शुभमचा प्रयोगाचा १० क्रमांक आला आहे, असे घोषित केले गेले. आगस्त्या फौंडेशनकडून या सगळया मुलांचा एक व्हाट्सअप ग्रुप करण्यात आला आहे. सी एल सी कडून विज्ञान प्रयोग भरवल्यामुळे शुभमला चांगली संधी मिळाली आहे. त्याच्या या यशा बद्दल डोअर स्टेप स्कूलच्या डायरेक्टर भावना कुलकर्णी आणि डोअर स्टेप स्कूलच्या असोसिएट डायरेक्टर सुनीला पागे यांनी शुभम दासचे अभिनंदन केले.



No comments:

Post a Comment