Saturday, April 9, 2022

"१० दिवस विना दप्तरी शाळा" एक प्रयोग

आपण बऱ्याच वेळा आपल्या अवतीभोवती बोलताना ऐकतो " मला माझ्या आयुष्यात पुढील शिक्षणासाठी मार्गर्दर्शन करण्यासाठी कोणीच नव्हते!", "मला कोणी हे आधी सांगितलंच नाही की पुढे काय करायचं, सांगितलं असत तर आज मी यशस्वी झालो असतो!" असं बरच काही बोलले जात आणि हे खर पण असत. कारण आता पर्यंत त्यांना कोणी सांगितलेले पण नसते आणि शाळेत पण फार कमी सांगितलेल असते. आणि काही वेळा करिअर च्या टप्प्यावर असताना आपल्याला बऱ्याच गोष्टी माहित नसतात. पुढे काय शिकावं? कोणती फिल्ड निवडावी? ती फिल्ड निवडल्यावर काय करायचं? असं बरच काही माहिती नसते. त्यातही काही पालक शिक्षित असले तर आपल्या मुलांना मार्गदर्शन करतात आणि ज्यांचे पालक शिक्षित नाही ते असच मग मिळेल ते शिकतात नाही तर आहेच आपलं वेठ बिगारी काम. असो.... आपल्या देशात दर वर्षी किंवा काही ठराविक कालावधी नंतर वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नावर उपाय म्हणून वेगवेगळे उपक्रम, नवनवीन योजना राबविल्या जातात. त्यात आरोग्य, विमा, बांधकाम , तसेच शैक्षणिक क्षेत्र असतात. अश्याच योजना पैकी "NEP २०२०" अशी योजना २०२० साली अंमलात आला. या योजने अंतर्गत ६ वी ते ८ वी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना "व्यावसायिक शिक्षण" याची ओळख करून द्यावी अशी ही योजना आहे. मागच्या दोन ते तीन महिन्यापासून डोअर स्टेप स्कूल या स्वयंसेवी संस्थेतील “सुपंथ” या प्रकल्पा अंतर्गत NEP २०२० ही योजना “१० दिवस विना दप्तरी शाळा ( १० days Bag less) असा छोटा प्रयोग घेण्यात आला. या प्रयोगाचे उद्दिष्ट्ये असे आहे की, इयत्ता सहावी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या व्यवसायाबद्दल मार्गदर्शन मिळावे, त्याचे महत्त्व त्यांना कळावे, तसेच त्यातून त्यांना पुढे करिअर निवडण्यासाठी त्याची मदत व्हावी. आपल्याकडे असे खूप योजना आखल्या तर जातात, पण त्यावर काम मात्र फारच कमी प्रमाणत होताना दिसून येत. किंवा खूपच कमी कालावधीसाठी त्या काही ठराविक ठिकाणीच राबविल्या जातात. NEP २०२० या योजनेची दखल घेत डोअर स्टेप स्कूल संस्थेने "सुपंथ " या प्रकल्पा अंतर्गत एक छोटा प्रयॊग पुणे महानगर पालिकेतील बावधन व कोथरूड विभागातील चार शाळेत राबवायला सुरुवात केली. या प्रयोगाला १० “दिवस विना दप्तरी शाळा”( १० days Bag less) असे नाव देण्यात आले. हा प्रयोग इयत्ता सहावी ते आठवी च्या विद्यार्थ्यासोबत घेण्यात आला. हा प्रयोग शाळेत घेताना सर्व नियम व अटींचे पालन करूनच घेण्यात आला. हा उपक्रम घेण्याआधी सुपंथ टीम मधील व्यक्तींनी व्यवस्थीत अभ्यास करून, नियोजन बद्ध पद्धतीने राबविला होता. या निययोजनात कोणती शाळा, कधी पासून हा प्रयोग राबवायचा, किती तास तो घेतला पाहिजे, कोण कोणते विषय विद्यार्थ्यांना सांगता येतील, अतिथी व्याखाने कशी असली पाहिजे, कोणत्या क्षेत्रातील व्यक्तींना मार्गदर्शनासाठी बोलवायचे असे उत्तम नियोजन केले होते. या प्रयोगातून मुलांना व्यवसाय शिक्षण म्हणजे काय? त्याचे महत्व, आणि स्वतःच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी याचा उपयोग कसा करू शकतात इत्यादी गोष्टी प्रामुख्याने सांगण्यात आल्या. या प्रयोगाचे शाळेत झालेल्या काही तासाचे वर्णन आहे. आज पर्यंत विद्यार्थ्यांनी व्यवसाय किंवा करिअर म्हणजे डॉक्टर, शिक्षक, गणवेशी सेवा( जिल्हाधिकारी) इत्यादींचा माहिती होत. पहिल्या दिवशी विदयार्थी खूपच शांत होती. त्यांना व्यवसाय शिक्षण असं काही तरी आहे हे माहीतच नव्हतं. आणि व्यवसाय शिक्षण म्हणजे काय? हे तर दूर राहील. त्यांना एखादा प्रश्न विचारला कि सर्व वर्ग एकदम शांत. ते कोणीही बोलायला तयारच नव्हते. मग सुपंथ टीम मधील आशुतोष सरांनी मुलांना बोलकं करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या खूपच जवळच्या आणि आजूबाजूच्या विषयावर प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुम्ही भाजी कोठून आणता? आजारी पडलात तर कुठे जाता? किराणा माल कुठून घेऊन येता? केस कुठे कापता इत्यादी त्या मुळे विद्यार्थी बोलायला लागली आणि त्यांना समजायला लागल अरे! हे तर आपल्या आजूबाजूचे व्यवसाय आहेत आणि आपण याचा कधी विचारच केला नाही. त्यांना व्यवसाय म्हणजे काय हे समजत होत आणि मग या साठी काही शिक्षण घ्यावे लागते का? याच उत्तरही ते स्वतः सांगत होती. पुढच्या तासाला त्यांना काही व्यावसायिक विषय देऊन त्यांना तो सर्व विद्यार्थ्यानं समोर मांडायला सांगण्यात आले आणि तो त्यांनी खूप आत्मविश्वासने खूपच सुंदर असं प्रदर्शित देखील केलं. यात विशेष म्हणजे विद्यानिकेतन शाळा नं ८ या शाळेतील विद्यार्थ्यांनी 'वाहन चालक' या विषयावर खूपच सुंदर भूमिका सादर केली असं वाटत होत आपण प्रत्यक्षात त्या बस मध्ये बसलोय आणि आजूबाजूला ते सर्व काही घडतंय. विद्यार्थ्यांना व्यवसाय जवळून अनुभवायला यावे म्हणून बाहेरील भेटी देखील झाल्या त्यातलीच एक भेट म्हणजे सोमेश्वरवाडी येथील 'ग्राम संस्कृती उद्यान'. या उद्यानात विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन, तेथील पारंपरिक व्यवसाय, गावातील शाळा, ग्रामीण भागातील रोजगार संधी, इत्यादी गोष्टी खूप जवळून बघता आल्या. या वरच आधारित आधुनिक काळात ग्रामीण व्यवसायचे आधुनिक रूपांतर याची थोडक्यात ओळख घडताना दिसली. उदाहरणार्थ "वाणी" - दुकानदार त्याचे आजचे झालेले सुपरमार्केट रूपांतर, शिंपी - आजचाटेलर आणि फॅशन इंडस्ट्री. या प्रयोगाचा अजून एक विशेष भाग म्हणजे अतिथी व्याख्याने यात वेगवेळ्या क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तींना बोलवण्यात आले. यात बागकाम, नर्स, संरक्षण दल, हॉटेल मॅनेजमेंट, कापड उद्योग, लॅब टेक्निशियनइत्यादी होते. व्यवसाय करणारी लोक जेंव्हा त्यांचा अनुभव सांगतात आणि त्याला अनुसरून विद्यार्थ्यांकडून जेंव्हा भरभरून प्रश्न येतात तेंव्हा खूप सुंदर असं वातावरण किंवा समज विद्यार्थ्यात दिसून येते. असे वेगवेळग्या व्यावसायिक क्षेत्रातील व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना हे व्यवसाय समजायला खूप मदत झाली. मुख्य म्हणजे त्यांना हे समजले कि कोणताही व्यवसाय छोटा नसतो. जर मेहनत घेतली तर ते त्याचे नाव परदेशा पर्यंत पोहचू शकतात. तेच काम खूप मोठ्या प्रमाणात करू शकतात. उदाहरणार्थ अनुजीत सर च्या तासाने मुलांना शिंपी हा व्यवसाय आज किती मोठ कापड उद्योग बनू शकते आणि तीच इंडस्ट्री फॅशन इंडस्ट्री म्हणून ओळखली जाते हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. एकंदरीत डोअर स्टेप स्कूल संस्था “सुपंथ” या प्रकल्पा अंतर्गत खूपच सुंदर असा प्रयोग शाळेत चालविला आहे. या प्रयोगात पहिला दिवस आणि शेवटचा दिवस यात खूप मोठा बदलही दिसून आले तो म्हणजे जे विद्यार्थी पहिल्या तासाला लपून लपून बसत होते आता तेच विद्यार्थी सर पुढचा तास कधी असं विचारत होते आणि ते विचारताना त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि आत्मविश्वास खूप काही सांगत होता. आणि हे सगळं पाहून सुपंथ टीम ला सुद्धा एक वेगळाच उत्साह देत असे आणि समाधानही,आणि या पुढे मुलांना अजून काय काय देऊ शकतो याचा विचारही. अशा प्रकारे हा १० दिवस विना दप्तरी शाळा हा प्रयोग उत्तम रित्या पार पडला. या प्रयोगाच्या शेवटच्या दिवशी अतिथी म्हणून पुणे महानगर पालिकेचे शिक्षण विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. यात प्रकल्प अधिकारी आवारे मॅडम, पर्यवेक्षिका खाडे मॅडम, शाळेतील मुख्याध्यापिका, आणि डोअर स्टेप स्कूल संस्थेच्या संस्थापिका रजनीताई परांजपे या देखील उपस्थित होत्या. या सर्व व्यक्तींनी या प्रयोगाचे भरभरून कौतुक सुद्धा केले. या सर्वांच्या शुभेच्यांने या कार्यक्रमाची सांगता झाली. आणि पुढे हि हे काम असेच अनेक शाळेत राबविले जावेत यासाठी देखील शुभेच्या देखील दिले गेले. विजयालक्ष्मी पोकलवार

No comments:

Post a Comment