Friday, May 5, 2017

Annual Presentation 2016-17

Since last 24 years, Door Step School has been running various educational activities for children from marginalized communities in the city of Pune.

Around 74,000 children were covered during year 2016-17, under projects like Educational Activity Centers and mobile classrooms for children from migrant communities, reading skill development programme for children studying in government schools, citizens' campaign for bringing out-of-school children into mainstream of formal education, transport facility for regular attendance in schools, parent awareness and empowerment programme, as well as a programme teaching good sanitation habits to children at young age.

To review all the activities conducted during last year, an Annual Presentation has been scheduled on next Saturday, 13th of May 2017, between 10:00am and 11:30am. All the donors, volunteers, and wellwishers of the organization are invited to attend the programme.

Venue: Nivara Hall, Navi Peth, Pune.
Google Maps Link: https://goo.gl/maps/ZGA567draiz 
Contact: 9766337431/32


शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांसाठी गेल्या २४ वर्षांपासून पुण्यामधे विविध शैक्षणिक उपक्रम 'डोअर स्टेप स्कूल'तर्फे राबविले जात आहेत.

स्थलांतरित मुलांसाठी वस्तीपातळीवरील वर्ग व चाकांवरची फिरती शाळा, सरकारी शाळांमधील मुलांसाठी वाचन संस्कार प्रकल्प, शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नागरिक अभियान, शाळेतील नियमित उपस्थितीसाठी वाहतुक सुविधा, तसेच पालकांचे सक्षमीकरण, लहान वयातच मुलांना स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी उपक्रम, या सर्वांमधून २०१६-१७ वर्षात सुमारे ७४,००० मुलांपर्यंत संस्थेचे काम पोहोचले आहे.

वर्षभरातील कामाचा आढावा घेण्यासाठी येत्या शनिवारी, १३ मे २०१७ रोजी सकाळी १०:०० ते ११:३० या वेळेत वार्षिक सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या सर्व देणगीदार, स्वयंसेवक, व हितचिंतकांनी सादरीकरणास उपस्थित रहावे, यासाठी हे आमंत्रण.

स्थळ: निवारा हॉल, नवी पेठ, पुणे.
गुगल मॅप्स लिंकः https://goo.gl/maps/ZGA567draiz 
संपर्कः 9766337431/32

No comments:

Post a Comment