Tuesday, May 9, 2017

Kirloskar WaSH Award for Door Step School

Water and Sanitation Hygiene (WaSH) is a programme developed by Kirloskar Foundation. Objective of the programme is to create awareness on sanitation, hygiene, and cleanliness among children. The programme is being implemented at educational activity centers of Door Step School since year 2011-12. Our implementation staff receives formal trainings organized by Kirloskar Foundation every month. Apart from trainings, the Kirloskar foundation team also provides all the centers with printed material to conduct the activities with children. 13 DSS supervisors have received 4 WaSH trainings during year 2016-17.

Below topics were covered this year since the programme started in July:

July 2016 - Formation of WaSH Club, WaSH processions in the communities (1,096 children participated)
August 2016 - Segregation of Waste (1,173 children participated)
September 2016 - Personal Hygiene (937 children participated)
November 2016 - Hand  Wash (988 children participated)
December 2016 - Awareness about Adolescents’ hygiene (29 children participated)
January 2017 - Parents Meeting (625 children and parents participated)

Children learnt importance of hand washing, clean water, personal and environmental hygiene, and cleanliness through practical methods. Significant impact is seen in many children in their awareness of these issues. Children are seen implementing these not only at home but also in their communities and schools. Door Step School has also bagged an award from Kirloskar Foundation, Pune for the year 2016-17 for "Incredible Contribution in Kirloskar WaSH Initiative"




'वॉटर ॲन्ड सॅनिटेशन हायजिन' (वॉश) हा 'किर्लोस्कर फाउंडेशन'चा एक उपक्रम आहे. सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छतेविषयी मुलांमधे जागरुकता निर्माण करणे, हा 'वॉश' उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. २०११-१२ पासून हा उपक्रम 'डोअर स्टेप स्कूल'च्या शैक्षणिक केंद्रांवर राबविला जात आहे. हा उपक्रम प्रत्यक्ष राबविणा-या आमच्या कार्यकर्त्यांना 'किर्लोस्कर फाउंडेशन'तर्फे दर महिन्याला औपचारिक प्रशिक्षण दिले जाते. तसेच, या केंद्रांवर मुलांसोबत उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक छापील साहित्यही 'किर्लोस्कर फाउंडेशन' तर्फे पुरवले जाते. २०१६-१७ या वर्षात आमच्या १३ कार्यकर्त्यांना 'वॉश' अंतर्गत ४ प्रशिक्षणांचा लाभ घेता आला.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात हा उपक्रम सुरु झाल्यापासून खालील विषयांवर काम करण्यात आले.

जुलै २०१६ - 'वॉश क्लब'ची स्थापना, वस्तीमधे 'वॉश' प्रक्रियेची सुरुवात (१,०९६ मुले सहभागी)
ऑगस्ट २०१६ - कच-याचे वर्गीकरण (१,१७३ मुले सहभागी)
सप्टेंबर २०१६ - वैयक्तिक स्वच्छता (९३७ मुले सहभागी)
नोव्हेंबर २०१६ - हात धुणे उपक्रम (९८८ मुले सहभागी)
डिसेंबर २०१६ - किशोरवयीन मुलांच्या स्वच्छतेबद्दल जाणीव जागृती (२९ मुले सहभागी)
जानेवारी २०१७ - पालक सभा (६२५ मुले व पालक सहभागी)

या उपक्रमातून मुलांना हात धुण्याचे, स्वच्छ पाण्याचे, तसेच वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शिकायला मिळाले. या विषयांबद्दल मुलांमधे लक्षणीय जागरुकता निर्माण झालेली दिसून येत आहे. यातून मिळालेल्या माहितीचा वापर मुले घरीच नव्हे तर वस्तीमधे व शाळेमधेही करताना दिसत आहेत. शिवाय, 'किर्लोस्कर वॉश उपक्रमा'मधील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल 'डोअर स्टेप स्कूल'च्या टीमला २०१६-१७ साठी किर्लोस्कर फाउंडेशन, पुणे यांच्याकडून विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यातही आले आहे.

2 comments:

  1. Congratulations for the great work, great service and a big inspiration to all the minds !

    ReplyDelete
  2. Congratulations for the great work, great service and a big inspiration to all the minds !

    ReplyDelete