Monday, May 29, 2017

DSS News in Divya Marathi Newspaper

हजारो शाळाबाह्य मुले आणली पुन्हा शैक्षणिक प्रवाहात

जयश्री बोकील । दिव्य मराठी | May 17,2017 5:50 AM IST

पुणे- विविध कारणांनी शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या ‘डोअर स्टेप स्कूल’तर्फे गेल्या वर्षभरात तब्बल ७४ हजार मुलांना शिक्षणाचा हक्क मिळवणे शक्य झाले आहे. संस्थेच्या प्रयत्नांमुळे प्रामुख्याने स्थलांतरित वाड्या-वस्त्यांमधील मुलांना शिक्षणाची वाट सापडली आहे.   
डोअर स्टेप स्कूलच्या संचालक भावना कुलकर्णी म्हणाल्या,‘संस्था स्थलांतरितांच्या मुलांसाठी वस्तीपातळीवरील वर्ग, चाकांवरची फिरती शाळा, सरकारी शाळांमधील मुलांसाठी वाचन संस्कार प्रकल्प असे अनेक उपक्रम सातत्याने करून मुलांना शाळांशी जोडून ठेवत आहे. २०१६-१७ या वर्षात सुमारे ७४ हजार मुलांना शाळेशी जोडण्याचे कार्य करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. मुलांना एकवेळ शाळेत दाखल करणे सोपे आहे, पण त्यांना शाळांमध्ये टिकवून ठेवणे, शिक्षणाची गोडी निर्माण करणे, वाचनाची सवय लावणे, पालकांचे सहकार्य मिळवणे या गोष्टी अधिक कठीण आहेत. मात्र, सातत्याने केलेल्या सामूहिक प्रयत्नांमुळे संस्थेला या कार्यात सकारात्मक यश मिळत आहे,”.   
असे केले प्रयत्न   
चाकांवरची फिरती शाळा, अशा त्रिविध स्तरांवर ‘डोअर स्टेप स्कूल’ने प्रत्यक्ष कार्य आणि पाठपुरावा केला. याशिवाय साक्षरता वर्ग (१९२९), अभ्याससत्रे (३४१४), पूर्वप्राथमिक शिक्षण (३२००), वाचनखोल्या (५९८), मुलांसाठी मुलांचे वाचनालय (३६९), वाड्या-वस्त्यांवरील वाचनालये (३२८), संगणक प्रशिक्षण (३२३), चाकांवरील शाळा ४ (३० ठिकाणे), पुन्हा शाळांत दाखल केलेली मुले ५०५, शाळांपर्यंत मुलांना नेणे-आणणे (१९४१), असे उपक्रम मोठ्या प्रमाणावर घेण्यात आले. 
शिकण्याची ऊर्मी कायम, हे यश   
गेल्या वर्षभरात स्थलांतरित झाल्याने ३६६० विद्यार्थी शाळेपासून दुरावले. त्यापैकी १४९० विद्यार्थ्यांचा मागोवा (४१ टक्के) घेण्यात संस्था यशस्वी झाली. या १४९० मुलांपैकी ९७२ मुले नव्या ठिकाणीही शाळांमध्ये जात असल्याचे सिद्ध झाले. ही गोष्ट खूपच सकारात्मक आणि आशादायी वाटते. मुलांना नव्या ठिकाणीही शाळेत जावेसे वाटणे, हे त्यांच्यातील शिकण्याची ऊर्मी स्पष्ट करणारे आहे. - भावना कुलकर्णी,  संचालक,  डोअर स्टेप स्कूल 


No comments:

Post a Comment